महिला आणि त्यांचे कायदेविषयक अधिकार
Keywords:
धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव एक दृष्टिक्षेप, जागतिकीकरण आणि भारत, मानवी हक्क सामाजिक न्यायाची वास्तवता, मानवी हक्क, भारतीय लोकशाहीची पायाभरणी आणि ब्रिटिशकालीन कायदे, भारतीय लोकशाहीतील महिलांचे सबलीकरण, अल्पबचतगट योजनेद्वारा महिलांचे आर्थिक व कायदेविषयक अधिकार, स्वयंसहाय्य्यता बचतगट आणि महिला सक्षमीकरण, पंचायत राज आणि ग्रामीण विकास, मूलभूत हक्क आणि भारतीय संविधान, अनुसूचित जाती-जमातीसाठी कायदे एक विश्लेषणात्मक अभ्यास, भारतीय राज्यघटनेचा सरनामा एक विश्लेषणात्मक अभ्यास, महिला सबलीकरण आणि कायदे, स्वयंसहाय्य्यता बचतगटाच्या महिलांचे सबलीकरणSynopsis
पुर्वी महिलांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते. चार भिंतीच्या बाहेर त्या जाऊ शकत नव्हत्या. पुरुषप्रधान वर्चस्वामुळे त्यांना दुय्यम स्वरुपाचे स्थान देण्यात येत होते. स्त्री-पुरुष समानता नव्हती. महिला सक्षमीकरणासाठी न्या. रानडे, आगरकर, राजा राममोहन रॉय यांनी फार मोठे योगदान दिले आहे. तसेच समाजातील महिला सक्षम होण्यासाठी महात्मा फुले, राजर्षी शाहु महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मुलींसाठी शाळा सुरु केल्यात. महिला शिकल्यामुळे त्या स्वावलंबी होत आहेत. विविध क्षेत्रामध्ये त्या नैपुण्य प्राप्त करीत आहेत. हे करीत असतांना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ असल्यामुळे महिला सक्षम होणे गरजेचे आहे. भारतीय राज्यघटनेत महिलांसाठी विविध कायदे करण्यात आले आहेत. तसेच महिला सबलीकरणासाठी शासनाकडून ज्या विविध उपाययोजना केल्या जात आहेत त्यांची माहिती प्रस्तुत ग्रंथामध्ये करण्यात आली असुन मानवी हक्क, महिलांचे घटनात्मक व कायदेविषयक अधिकार, अल्पबचत योजनेद्वारा महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकास, पंचायतराज व ग्रामीण विकास, धर्मनिरपेक्षता आणि भारतीय लोकशाहीची पायाभरणी व ब्रिटीश कालीन कायदे यांची मांडणी या ग्रंथात करण्यात आली आहे. या ग्रंथाच्या लेखन कार्यास मला अनेक मित्र व हितचिंतकांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्याबद्दल सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे माझे कर्तव्य समजतो. माझ्या लेखन कार्यास माझे गुरुवर्य अप्पासाहेब प्राचार्य डॉ. पी.डी. देवरे यांची प्रेरणा लाभली आहे. श्री. शि.वि.प्र. संस्थेचे अध्यक्ष आमदार बाबासो श्री. कुणाल पाटील, उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील, शिंदखेडा महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. प्रफुल्लकुमार सिसोदे, उपाध्यक्ष श्री. अशोक पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री. प्रमोद पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहरराव पाटील, डॉ. सुधीर पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मोहन पावरा, प्राचार्य डॉ. एस.टी सोनवणे, एन. मुक्टोचे मा. अध्यक्ष प्रा.डॉ. संजय सोनवणे, प्राचार्य डॉ. एम.व्ही. पाटील, प्राचार्य सी.व्ही. पाटील, ज्येष्ठ प्रा. डॉ. पी.यु. नेरपगार, प्रा. ए.डी. पाटील, प्राचार्य डॉ. एम.एच. शिंदे, प्राचार्य डॉ. अशोक खौरनार, प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे, प्राचार्य डॉ. बी.आर. चौधरी, प्रा.वाय.एन. साळुंके, प्रोफेसर डॉ. सुरेंद्र मोरे, उपप्राचार्य डॉ. एस.व्ही. बोरसे, प्रा. ए.आर. पाटील, प्रा. के.व्ही. महाले, प्रा. शशीकांत बोरसे, डॉ. रवि वाघ, केंद्रीय एन. मुक्टोचे सचिव डॉ. जितेंद्र तलवारे, प्रा. डॉ. एस.के. जाधव प्रा. डॉ. दिपक पाटील तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाज्यांचे सहकार्य लाभले.