मराठी साहित्याचा इतिहास. स. १८१८ - २०१०
Keywords:
प्रास्ताविक, मराठी साहित्य इतिहासात स्त्री आत्मकथनांचे मोलाचे योगदान, आत्मचरित्र म्हणजे काय, २१ व्या शतकातील काही प्रातिनिधिक आत्मकथनांचा अभ्यास, समारोप, आधारभूत संदर्भ, पार्श्वभूमी, डॉ. आ. ह. साळुंखे यांचे साहित्यिक म्हणून वेगळेपण, डॉ. आ. ह. साळुंखे यांचे साहित्याची कलात्मक बाजू, आ. ह. च्या साहित्यातील तत्वज्ञान, मनुस्मृति, मानसशास्त्रीय विचारSynopsis
पुणे महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी वाङ्मयाचा इतिहास सात खंडांत प्रकाशित केला आहे. हा वाङ्मय इतिहास ई-बुक आणि मोबाइल ई-बुकच्या माध्यमांतही वाचायला मिळतो. १९८४ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. शं.गो. तुळपुळे, स.गं. मालशे, रा.श्री. जोग, गो.म. कुलकर्णी, व.दि. कुलकर्णी, प्रा. रा.ग. जाधव यांच्या सारख्या दिग्गजांनी या खंडांचे संपादन केले आहे. याचबरोबर ' भाषा व साहित्य : संशोधन' (खंड १, २ आणि ३ संपादक : डॉ. वसंत जोशी, म. ना. अदवंत), 'हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर' (खंड १ आणि २ संपादक : राजेंद्र बनहट्टी आणि डॉ. गं. ना. जोगळेकर), 'महाराष्ट्र साहित्य पत्रिका सूची' (सूचीकार : मीरा घांडगे), 'सुलभ मराठी शुद्धलेखन पुस्तिका' अशी मसापची १९ प्रकाशने ई-बुक आणि मोबाइल ई-बुक रूपात उपलब्ध झाली आहेत. वाङ्मय इतिहासाच्या सातव्या खंडातील भाग १ ते ४चे संपादन प्रा. रा.ग. जाधव यांनी केले आहे. ई-बुक आणि मोबाइल ई-बुक त्यांच्या स्मृतीला अर्पण केले आहे.