आधुनिक शिक्षणातील प्रचलित प्रवाह
Keywords:
लैंगिक शिक्षण, लैंगिक शिक्षणाची अर्थ, लैंगिक शिक्षणाची गरज, लैंगिक शिक्षणाची उद्दिष्ट्ये, बालगुन्हेगारांसाठी शिक्षण, बालगुन्हेगारीचे स्वरूप, बालगुन्हेगारिची लक्षणे, बालगुन्हेगारिची वैशिष्ट्ये, बालगुन्हेगातिचे प्रकार, उद्योजकतेसाठी शिक्षण, उद्योजकता शिक्षणाचा अर्थ, उद्योजकता शिक्षणाची आवश्यकता, उद्योजकता शिक्षणाचे महत्त्व, उद्योजक बनवण्यासाठी आवश्यक कौशल्य, लोकशाही नागरिकत्वाठी शिक्षण, लोकशाही नागरिकत्व शिक्षणाची गरज व महत्व, आरोग्य शिक्षण, आरोग्य शिक्षणाची व्याप्ती, आरोग्य शिक्षणाची वैशिष्ट्ये, सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण, सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात शिक्षणाची भूमिका, महिला सबलीकरण आणि शिक्षण, स्त्री शिक्षणाचे महत्त्व, स्त्री शिक्षणाच्या समस्या, स्त्री शिक्षणाची उपाययोजना, मूल्य शिक्षणाचे बदलते संदर्भ, मूल्य शिक्षणाचा अर्थ व संकल्पना, मुल्य शिक्षणासाठी शैक्षणिक उपक्रम/कार्यक्रम, संदर्भSynopsis
वर्तमान काळात शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत आहेत. समाज हे प्रयोग आणि बदल स्वीकारण्याच्या मनस्थितीत असतो. जागतिक पातळीवर आपल्याला सर्वांगीण प्रभाव निर्माण करायचा असेल तर विशेष करून शैक्षणिक प्रयोग, प्रगती व विस्तारावर विशेष भर द्यावा लागेल. याच बरोबर वर्तमान स्थितीत जे शिक्षणाचे प्रवाह प्रचलित आहेत त्यांच्यातही काही नवे बदल करता येतील का याचाही विचार झाला पाहिजे. आधुनिक काळात संगणक आणि इन्टरनेट मुळे जग जवळ आले आहे. जी हवी ती माहिती गुगल मुळे क्षणात उपलब्ध होते. तंत्रज्ञानाने सर्व समाज व्यापला आहे. यामुळे त्या गतीने वैचारिक परिवर्तन अपेक्षित असते. हे वैचारिक परिवर्तन फक्त शिक्षणामुळे होत असते. या सर्व गोष्टींचा विचार करता आधुनिक काळातील शिक्षणातील काही प्रचलित प्रवाहांचा उहापोह करण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात लेखकाने केलेला आहे.