पर्यावरणाचे अर्थशास्त्र
Keywords:
पर्यावरण अर्थशास्त्र, आर्थिक विकास आणि पर्यावरणीय समस्या, शाश्वत विकास, पर्यावरण संकल्पना, परिसंस्था, जैवविविधता, पर्यावरण संवर्धन, पर्यावरणपूरक विकास, पर्यावरण संरक्षणातील लोकांची भूमिका, मूल्यनिर्धारण विभागाच्या पद्धती, पर्यावरण लेखापरिक्षण, पर्यावरणाचा ऱ्हास, लोकसंख्या वाढ, शहरीकरण आणि पर्यावरणाचा ऱ्हास, ओझोन थराचा ऱ्हास, ग्रीन हाऊस इफेक्ट, पर्यावरण प्रदूषण, पर्यावरण संरक्षण, पुनर्वापर, कचरा व्यवस्थापन, सामाजिक वनीकरण, पर्यावरण धोरणे, प्रदूषण नियंत्रण मंडळाची कार्येSynopsis
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने जून 2020-21 पासून एमए भाग 1 या वर्गासाठी पर्यावरणाचे अर्थशास्त्र हा विषय बंधनकारक केला आहे.त्याला अनुसरून लिहिलेले हे पुस्तक विद्यार्थी मित्रांच्या हाती देताना विशेष आनंद होत आहे.नवीन अभ्यासक्रम लक्षात घेऊन या पुस्तकातील सव॔ प्रकरणांची सुयोग्य मांडणी केली आहे.
या पुस्तकात सत्र 1 मध्ये पर्यावरण अर्थशास्त्राची व्याख्या, व्याप्ती, पर्यावरण संकल्पना,पर्यावरण संरक्षणात विविध क्षेत्रांची भूमिका,पर्यावरण विभागाचे मूल्यांकन करण्याच्या पध्दती तसेच सत्र 2 मध्ये पर्यावरणाचा -हास पर्यावरण प्रदूषण, पर्यावरण संरक्षण, मूल्य निधा॔रण विभागाच्या पध्दती यांची चर्चा केली आहे. सदर पुस्तकात आवश्यक तेथे फोटो व संदर्भ दिले आहेत. हे पुस्तक लिहिताना अनेक संदर्भग्रंथांचा वापर केला आहे. त्या सव॔ ग्रंथकारांचा त्रृणी आहे. आमच्या महाविद्यालयातील ग्रंथालय कर्मचारी यांनी वेळोवेळी आवश्यक संदर्भग्रंथ उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानतो. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ.भारती रेवडकर, तसेच महाविद्यालय माझे सहकारी मित्र यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले याबद्दल त्यांचेही आभार मानतो.
कृपा दृष्टी पब्लिकेशन्स, पुणे यांनी पुस्तक प्रकाशनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांचा त्रृणी आहे. अभ्यासकांनी काही सूचना केल्यास त्यांचे स्वागत होईल.