वित्तीय संस्था व बाजारपेठा
Keywords:
आर्थिक प्रणालीचे स्वरूप आणि भूमिका, आवथिक मध्यस्थ, आर्थिक प्रणालीची रचना, आर्थिक विकासाचे निर्देशक, मालमत्तेचे मूल्यांकन, व्याजदराची रचना, केनेशियन आणि ISLM व्याज सिद्धांत, मध्यवर्ती बँक आणि व्यापारी बँका, चलनविषयक धोरण, आधुनिक बँकिंग , बिगर बँकिंग वित्तीय संस्था , आर्थिक बाजार , व्याजदरांची रचनाSynopsis
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने जून 2020-21 पासून एमए भाग 1 या वर्गासाठी वित्तीय संस्था व बाजारपेठा हा विषय ऐच्छिक ठेवलेला आहे.त्याला अनुसरून लिहिलेले हे पुस्तक विद्यार्थी मित्रांच्या हाती देताना विशेष आनंद होत आहे.नवीन अभ्यासक्रम लक्षात घेऊन या पुस्तकातील सव॔ प्रकरणांची सुयोग्य मांडणी केली आहे.
या पुस्तकातील सत्र 1 मध्ये वित्तीय व्यवस्थेचे स्वरूप व भूमिका, व्याजदरांची रचना, मध्यवर्ती बँक, व्यापारी बँका व चलनविषयक धोरण, आधुनिक बँकिंग या घटकांचा समावेश आहे. सत्र 2 मध्ये बिगर बँकिंग वित्तीय संस्था,वित्तीय बाजारपेठा, भारतातील वित्तीय बाजारपेठा, व आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजारपेठा यांचा समावेश आहे.
सदर पुस्तकात आवश्यक तेथे फोटो व संदर्भ दिले आहेत. हे पुस्तक लिहिताना अनेक संदर्भग्रंथाचा वापर केला आहे.आमच्या महाविद्यालयातील ग्रंथालय कर्मचारीवर्ग यांनी वेळोवेळी आवश्यक संदर्भग्रंथ उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानतो. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ.भारती रेवडकर, तसेच महाविद्यालयातील माझे सहकारी मित्र यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले याबद्दल त्यांचेही आभार मानतो.
तसेच माझे कुटुंबीय, मित्रपरिवार यांनीदेखील मला सहकार्य केले याबद्दल त्यांचेही आभार मानतो.