राष्ट्रीयीकृत व्यापारी बँका व पुणे जिल्हयाचा विकास
Keywords:
अर्थव्यवस्था, बँकिंग, विकास, वित्तीय, आर्थिक, मोजमाप, भांडवल, निधी, तुटवडा, समतोलSynopsis
कोणत्याही अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग हा बँकिंग पद्धती असतो. अर्थव्यवस्थेच्या प्रगतीत बँक या संस्थेचा मोलाचा वाटा असतो. बऱ्याच अर्थतज्ज्ञांच्या मते बँकिंग पद्धतीमुळे विकास होतो. बँका या जगाच्या व्यापाराची पेठच आहे. तर देशाच्या आर्थिक आणि वित्तीय बाबींची बँक मुख्य नाडीच मानली जाते. तसेच बँका देशाच्या आर्थिक घडामोडींचे मोजमाप करण्याचे साधन आहे.1 बँका फक्त पैशाची देवाणघेवाणच करीत नाहीत तर त्या देशाचा विकास घडवित असतात. तसेच बँका समाजाच्या बचती साठविण्याचे केंद्र असून त्या वित्तीय पताच्या प्रतिनिधी असतात. बँका देशाच्या साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त वापर करून त्या देशाचा विकास घडवून आणण्याचे मुख्य कार्य करतात. यात देशाच्या ज्या भागात वित्तीय भांडवल निधीची जास्त गरज आहे परंतु वित्तीय भांडवलाचा तुटवडा आहे अशा भागात आवश्यकतेनुसार वित्तीय भांडवलाचे स्थलांतर करून योग्य प्रादेशिक उत्पन्न भांडवलाचा समतोल बँका घडवून आणतात. तसेच देशाच्या सर्व भागांचा समतोल विकास घडवून आणतात.
भारताच्या बँकिंग वित्तीय पद्धतीमध्ये व्यापारी बँका मोठ्या प्रमाणावर वित्तीय साधनांना उपयोगात आणून त्यांचे योग्य पद्धतीने विभाजन करतात. भारतासारख्या विकसनशील देशाच्या आर्थिक वृद्धीमध्ये बँका मोलाचा वाटा उचलतात. जुलै 1969 साली 14 व्यापारी बँका व एप्रिल 1980 साली 6 व्यापारी बँकांच्या राष्ट्रीयीकरणानंतर देशाच्या आर्थिक विकासास चालना मिळाली.